पुणे बेंगलोर महामार्गावर अपघातात नगरचे तिघे ठार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पुणे बेंगलोर महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या ट्रक व कार यांच्या अपघातात नगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे वृत्त नगरमध्ये धडकताच सावेडीतील व्यावसायिकांमध्ये शोककळा पसरली. रविवारी सर्व व्यावसायिक एक दिवस बंद ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
सावेडी भागात प्रोफेसर कॉलनीतील रोहित रोशन उडपी सेंटरचे मालक मॉन्फोरो डिसुझा, त्यांची पत्नी व रोहित डिसुझा (मुलगा) अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा अपघात शनिवारी पहाटे कर्नाटकमध्ये झाल्याचे डिसुझा यांच्या व्यावसायिक मित्रांनी सांगितले. मूळचे कर्नाटकमधील मँगलूरचे रहिवाशी असलेले डिसुजा कुटुंबीय अनेक वर्षांपासून नगरमधील पाईपलाईन रोडला वास्तव्यास होते. उन्हाळ्यात दरवर्षी ते गावाकडे जायचे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ते कर्नाटकला गेले होते.
परतीच्या प्रवासा दरम्यान, पुणे बेंगलोर महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये नगरमधील या तिघांचा समावेश आहे.
डिसुझा यांची डोसा तयार करणारी प्रोफेसर चौकात खाद्य पदार्थाची गाडी आहे. 17 वर्षांपासून ते सावेडीत व्यवसाय करीत होते. डिसोजा अण्णा या नावाने ते प्रसिद्ध होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची त्यांच्या गाडीवर नेहमीच गर्दी असते. त्यांचा दुसरा मुलगा रोशन हा ख्रिश्चन धर्माचा प्रचारक आहे. काही कामानिमित्त तो नगरमध्येच थांबला होता. अपघाताची माहिती दुपारी नगरमध्ये धडकली त्यावेळी सावेडीमधील व्यावसायिकांनी हळहळ व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*