कर्जाला कंटाळून पानेगावच्या शेतकर्‍याची आत्महत्या

0

सोनई (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील भाऊसाहेब फकिरा पटारे या शेतकर्‍याने खाजगी सावकार तसेच बँकांच्या कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षापासून शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असून सरकारच्या कर्जमाफी न केल्याचा बळी नेवासा तालुक्यातील गेला असून या हृदयद्रावक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता तरी सरकारला जाग येईल कि नाही?असा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकर्‍यांना पडला आहे. शेतीमालाला भाव नसल्यामुळे सावकार तसेच बँक, सोसायटी यांच्याकडून कर्ज काढून कसेबसे पीक केलेे होते. मात्र शेतमालाला हमीभाव नसल्याने तसेच महावितरणच्या भारनियमनामुळे पाणी असून विजेअभावी पिके जळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे आत्महत्येसारखा मार्ग शेतकरी स्वीकारीत आहेत.
पानेगाव येथील भाऊसाहेब फकिरा पटारे या तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून 7 मे रोजी आपल्या स्वतःच्या शेतात गट नंबर 275 मध्ये सकाळी 11 वाजता विषारी पदार्थ प्राशन केले. त्यांना तत्काळ नगर येथे हलविण्यात आले. परंतु रात्री आठ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. रात्रीच्या दरम्यान त्यांच्या वर पानेगाव येथे अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*