कर्जमुक्तीसाठी संघटीतपणे आवाज उठवावा – आ.पाटील

0
धुळे / राज्यातील शेतकरी दुष्काळ,नापिकी आणि कर्जाच्या संकटात सापडला आहे, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र पेटला असतांना भाजपा सेनेचे सरकार आजही कर्जमाफीवर उदासिन आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी संघटीतपणे आवाज उठवावा असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने बोरकुंड ते नंदाळे या रस्त्याला मंजुरी मिळाली असून आज दि.10 जून रोजी आ.पाटील यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, निवडणूकीच्या वेळेस मी बोरकुंड आणि नंदाळे ग्रामस्थांना शब्द दिला होता त्यानुसार आज या रस्त्याच्या कामास प्रारंभ होत असून तालुक्यातील इतर रस्ते करीत असतांना या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले असे त्यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनाबाबत बोलतांना आ.पाटील म्हणाले की, सरकार शेतकर्‍यांमध्ये फूट पाडून शेतकर्‍यांतच भांडणे लावण्याचे षडयंत्र करीत आहे.

म्हणून शेतकर्‍यांनी संघटीतपणे उभे राहून सरकारला झुकविले पाहिजे. कुुंडाणे (निमखेडी) ते जापी रस्त्याच्या मंजुरीकामी धुळे शहराचे आ.अनिल आण्णा गोटे यांचे विशेष सहकार्य मिळाले त्यांच्या सहकार्याने कुुंडाणे (निमखेडी) ते जापी हा रस्ता मंजुर करण्यात आला.

भविष्यात वरखेडी-कुंडाणे दरम्यान रस्त्यावरील नाल्यावर पुल कम बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. अत्यंत कमी कालावधीत आपण तालुक्यात सुमारे 41 कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे केली आहेत.

बोरकुंड ते नंदाळे हा एकूण 4.50 कि.मी.एवढ्या अंतराचा असून यासाठी एकूण 2 कोटी 15लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.

या रस्त्यावर एकूण चार स्लॅबड्रेन आणि तीन पाईप मोर्‍या बांधल्या जाणार आहेत. या रस्त्यामुळे बोरकुंड, नंदाळे ग्रामस्थांना रहदारीची उत्तम सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

*