कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क ; छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना कारागृहातून पत्र

0

मुंबई : नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांने कांद्याला भाव न मिळाल्याने आपले पाच एकरातील कांद्याचे उभे पिक जाळून टाकले. राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी त्याठिकाणी फिरकला नाही.

त्या घटनेची खंत बाळगत सरकार जर शेतकऱ्याच्या संकटात धीर देऊ शकत नसेल, तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी”. अशी याचना डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची घटना नुकतीच घडली.

राष्ट्रवादीचे नेते  आमदार छगन भुजबळ यांनी आर्थररोड कारागृहातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून या घटनेकडे त्यांचे गांभीर्याने लक्ष वेधून उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

शेतमालाला भाव मिळत नसल्याने वैतागून काढणीला आलेले पाच एकर कांदा पिक स्वतः जाळून टाकले. इतके घडूनही राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नसल्याची मनाला खंत बाळगत सरकार जर शेतकऱ्याच्या संकटात धीर देऊ शकत नसेल,तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी”. अशी याचना डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

सतत काबाडकष्ट करून शेती पिकवणारा शेतकरी अतिशय स्वाभिमानी आहे. त्यांना सरकारकडून काहीही उपकार नको आहे. त्यांना हवा आहे त्यांच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारीत रास्त हमी भाव! तो तुम्ही देवू शकत नाही म्हणून त्यांना कर्जमाफीसाठी क्षमा याचना करावी लागत आहे.

सरकार हे मायबाप असते. त्यांना आता गरज आहे मायबाप सरकारच्या आधाराची. आपनांसारखे संवेदनशील असलेले मुख्यमंत्री आणि आपले आपले सरकार श्री कृष्णा डोंगरे यांच्यासह राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*