कर्जमाफी विरोधात न्यायालयात जाणार : घुले

0

पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

 

पारनेर (प्रतिनिधी) – राज्य शासनाने दिलेल्या फसव्या कर्जमाफी विरोधात पक्षातर्फे न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी सांगितले.

 

 

पारनेर येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घुले बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा धाडगे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, ज्येष्ठ नेते सबाजी गायकवाड, गंगाराम बेलकर आदी उपस्थित होते.

 

 

घुले म्हणाले, राज्य शासनाची कर्जमाफी फसवी असून यासाठी विविध अटी व नियम लागू असल्यामुळे कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील दहा टक्के शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे घुले यांनी सांगितले.

 

 

यावेळी सुजीत झावरे म्हणाले. शिवसेना सत्तेतही सहभागी असून सरकारच्या विरोधातही खोटं भांडल्याचे नाटक करीत आहे. सेनेची ही लबाडी लोकांच्या लक्षात आली आहे. तालुक्यात राष्ट्रवादीकडे फारसे सत्ताकेंद्र नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनबा भापकर यांनी केले.

 

 

पारनेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पद वाटप पारनेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पद वाटप तालुकाध्यक्षपदी पठारे, युवक अध्यक्षपदी घुले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अखेर दादासाहेब पठारे यांची नियुक्ती करण्यात आली. तर अनेकांना पदे वाटप करून काहींचे खांदेपालट करण्यात आले आहे.

 

राष्ट्रवादीच्या युवक तालुकाध्यक्ष पदी पिंपळगाव रोठाचे सरपंच अशोक घुले तर उपाध्यक्षपदी माजी पंचायत समितीचे सदस्य शंकर नगरे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी दिलेले नियुक्तीचे पत्र ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते, सुजित झावरे यांच्या उपस्थितीत पठारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  जिल्हा उपाध्यक्षपदी मधुकर म्हतारबा उचाळे, बाळासाहेब पोपटराव माळी, सोन्याबापू प्रभाकर भापकर, किसन सबाजी रासकर तर ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष किसन लोंढे तर जिल्हा कार्यध्यक्षपदी माजी सभापती अरुणराव ठाणगे यांची निवड करण्यात आली.

 

तर पारनेर महिला तालुकाध्यक्षपदी सुधामती विठ्ठल कवाद, सेवादलपदी सबाजी शिवाजी शेरकर, अल्पसंख्याक निजाम इब्राहीम पटेल, मागासवर्गीय बाळासाहेब कचरू अवचिते, डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.आबासाहेब खोडदे. वकील सेलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सचिन शिवाजी पठारे, अपंग सेल दीपक केरू गुंजाळ, किसान सेल प्रदीप कमलाकर, सोमवंशी ग्रंथालय सेल प्रवीण शिकारे, प्रवक्तेपदी मोहन सुभाष रोकडे, सोशलमीडिया योगेश अशोक मते, सहकार प्रकाश तुकाराम गाजरे, कामगार सुभाष विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ नागरिक वसंतराव गंगाधर मोरे, ओबीसी सेल संदीप शंकर रासकर, बंजारा सेल बबन जयराम पवार. नाभिक समाज तालुकाध्यक्ष सुनील गुलाबराव लोंढे, अपंग सेलच्या कार्याध्यक्षपदी अरुण कचरू गवळी आदिंची निवड जाहीर करून पत्र देण्यात आले आहे. अनेकांना संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

LEAVE A REPLY

*