Type to search

जळगाव

कर्जमाफी तक्रारी निवारणासाठी तालुकास्तरीय समित्या गठीत

Share

जळगाव । राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी 28 जून 2017 रोजी निर्णय घेण्यात आला होता. परंतु या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी शासनाकडे तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत असल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारींचे निवारणासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहे.

राज्य शासनाच्या कर्जमाफी निर्णयातील तरतुदीनुसार कृषी कर्जास कर्जमाफी, कृषी कर्जाची परतफेड विहीत वेळेत करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनात्मक अनुदान तसेच एकवेळ परतफेड योजना राबविण्यात येत आहेत. शेतकर्‍यांच्या तक्रारी निवारण संदर्भात संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तालुक्यातील प्रतिनिधी, अग्रणी बँकेचा तालुक्यातील प्रतिनिधी, संबंधित तालुक्यातील लेखापरीक्षक हे सदस्य तर सहकार अधिकारी श्रेणी-1 हे सदस्य सचिव आहेत. या समितीची सभा प्रत्येक सोमवारी व गुरुवारी उपनिबंधक अथवा उपसहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात आयोजित करण्याच्या सूचना सहकार आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!