कर्जमाफीबाबत चर्चेतूनच तोडगा – ना.आठवले

0
जळगाव / राज्यातील शेतकर्‍यासह प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. फडणवीस सरकार हे शेतकर्‍यांच्या बाजूने असुन कर्जमाफीबाबत चर्चेतुनच तोडगा निघेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
दरम्यान बॉम्ब फेकण्याची आ. बच्चु कडूंची भाषा ही अतिरेक्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना शेतकरी संपाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे.
31 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईनही त्यांनी दिली आहे. परंतु शेतकरी संघटनांना त्याआधी निर्णय हवा असेल तर एकत्र येऊन चर्चा करण्याची तयारी दाखवावी लागेल.

विरोधकांनीही संयम बाळगला पाहीजे. सगळ्यांनी एक होऊन चर्चा केल्यास या मुद्यावर तोडगा निघू शकतो असेही ना. आठवले यांनी सांगितले.

तसेच केंद्रातील एनडीए सरकारला 26 मे रोजी तीन वर्ष पुर्ण झाले. त्यानिमीत्ताने सर्वसामन्य जनतेसाठीच्या अनेक योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे.

सन 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा सरकारचा मानस आहे. इंदूमिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फुट उंच पुतळा उभारला जाणार आहे.

पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतचा कायदा लवकरच करण्यात येणार आहे. तसेच ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी महामंडळाला घटनात्मक दर्जा देखिल दिला जाणार आहे.

मोदी सक्षम असल्याने कुणी टिकणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असल्याने त्यांच्यासमोर कोणीही टिकणार नाही. मोदी सरकार हे मुस्लिमांविरोधात नसल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.

नोटबंदी हा क्रांतीकारक निर्णय होता. क्रांती करतांना थोडाफार त्रास सहन करावा लागतो असे सांगून ना. आठवले यांनी नोटबंदीचे समर्थन केले.

यावेळी पत्रकार परीषदेस राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, खा. ए.टी.पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*