कर्जमाफीचे अद्याप कोणतेही आदेश नाही- जिल्हाधिकारी

0
जळगाव । दि 13 । प्रतिनिधी-राज्य शासनाने दोन दिवसापूर्वी सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे.
परंतू या कर्जमाफीचे जिल्हात कोणतेही आदेश आले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली.
राज्यातील कर्जबाजारी असलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी राज्यातील शेतकरी दि. 1 रोजी पासून रस्त्यावर उतरुन आंदोलने करण्यात आली होती.

दरम्यान विरोधी पक्षाच्या व शेतकर्‍यांच्या दबावामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. तसेच मुंबईत झालेल्या उच्चाधिकार मंत्रीगटासोबत झालेल्या शेतकर्‍यांच्या सूकाणू समितीच्या बैठकीत सरकारने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली.

तसेच अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज दि. 12 रोजी पासून माफ करण्याचे देखील जाहिर केले होते. परंतू जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्‍यांच्या कर्जमाफी संदर्भात अद्याप कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*