कर्जमाफीचा जिल्हा बँकेत 4.5 लाख शेतकर्‍यांना फायदा

0

 अहमदनगर – शेतकर्‍यांच्या आंदोलानापुढे झुकलेल्या राज्य सरकारने शेतकर्‍यांचे कर्जमाफीचा निर्णय तत्वत: मान्य केला आहे.

त्यानुसार शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी दिल्यास जिल्ह्यातील 4 लाख 37 हजार 959 सभासद शेतकर्‍यांचे 2280 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.

जिल्हा सहकारी बँकेने 31 मार्च 2017 अखेर 4 लाख 37 हजार शेतकर्‍यांना 2280 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यात अल्पभूधारक कर्जदार शेतकर्‍यांचा समावेश आहे.

अल्पभूधारक सभासद शेतकर्‍यांमध्ये अल्प मुदत कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची संख्या 3 लाख 71 हजार 745 असून मध्य मुदत कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची संख्या 52 हजार 485 तसेच दिर्घ मुदत कर्ज घेतलेल्या कर्जदारांची संख्या 13 हजार 726 इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*