कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

0

सिन्नर : तालुक्यातील सोनगिरी येथील शिवाजी भिकाजी बोडके (४४) या कर्जबाजारी शेतकर्‍याने सोमवारी (दि.२०) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान राहत्या घरात विषारी औषध सेवन करुन आपली जीवन यात्रा संपवली.

बोडके यांची सामुहीक कुटुंबाची ५ एकर शेती असून त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांना २ मुली व एक मुलगा असून छोट्या मुलीची दहावीची परिक्षा आहे. तर मोठ्या मुलीचे लग्न ठरले असून तिच्या लग्नासाठी त्यांना पैशांची गरज होती.

मात्र, शेतीसाठी त्यांनी नायगावच्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेचे पावणे तीन लाखाचे कर्ज घेतले असून त्या कर्जाच्या वसुलीची नोटीस आल्याने ते अस्वस्थ होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी शेतात फवारणीसाठी आणलेले औषध सेवन केले.

ही बाब त्यांच्या शेजारी राहणार्‍या भावासह कुटुंबियांनी त्यांना तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असतांनाच रात्री ९.३० च्या दरम्यान शिवाजी यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*