Type to search

क्रीडा धुळे

कबड्डी स्पर्धेत धुळे विभागाने पुरुष व महिला दोन्ही गटात पटकाविले विजेतेपद

Share

धुळे । शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित झेड.बी.पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विभागीय कबड्डी (पुरुष-महीला) स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठ अधिसभा सदस्स प्रा.डॉ.संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, . संजय पाटील समपुदेशक बलगट, प्रो-कबड्डी- खेळाडू महेंद्र राजपूत, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समिती संयोजक उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगीता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. नितीन वाळके यांनी केले.

झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे येथे दि.16 व 17 ऑक्टोबर या दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत जळगाव,एरंडोल, धुळे व नंदुरबार या विभातून मुलांचे 4 व मुलींचे 4 असे एकूण 8 संघानी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील मुलांच्या अंतिम चुरशीच्या सामन्यात धुळे विभागाने जळगाव विभागाचा 33-24 असा पराभव करत जेतेपद पटकावले तर मुलींच्या अंतिम चढाओढीच्या सामन्यात धुळे विभागाने जळगाव विभागाचा 40-25 असा पराभव करत जेतेपद पटकावले. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यापीठ अंतर्गत विभागीय कबड्डी स्पर्धेत धुळे विभागाने 13 वर्षानंतर पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महिला व पुरुष दोन्ही गटात धुळे विभाचे कर्णधारपद झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी भूषविले.

स्पर्धेतील विजेता, उपविजेता संघ व उत्कृष्ट खेळाडूंना प्रो-कबड्डी- खेळाडू महेंद्र राजपूत, प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

उत्कृष्ट खेळाडू मुले: बेस्ट रायडर – कल्पेश शिंदे, धुळे, बेस्ट डिफेडर -रिष्भ जैन, जळगांव, बेस्ट ऑलरायडर – सागर सगरे, धुळे मुली:बेस्ट रायडर – प्रवीण तडवी, जळगाव, बेस्ट डिफेडर – चैताली पाटील,धुळे, बेस्ट ऑलराउंदर- मयुरी बागुल, धुळे. राज्यस्तरीय पंच दिलीप साळुंके, अभय सोनार, सागर कासार, नरेंद्र नगराळे, शरद फुलपगारे अकील शेख, देवकरआप्पा गवळी यांनी पंच म्हणून मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपाप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार, उपप्राचार्या प्रा.सौ.अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य प्रा.नितीन वाळके, प्रा.डॉ.प्रविणसिंग गिरासे प्रा.डी.के.पाटील, प्रा.अमोल पाटील, प्रा.पवन चौधरी, प्रा.ललीत चौधरी, प्रा.राहुल पाटील, प्रा.उदय पाटील कबड्डी असोसिएशनचे सदस्य जितेंद्र ठाकरे, राहुल चौधरी, मंगेश सोनवणे, मनोहर चौधरी, पिंटूभाऊ सपकाळ यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!