कपिल शर्मा रुग्णालयात दाखल

0

कपिल शर्मा याला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कपिल शर्माचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याला ‘द कपिल शर्मा’ शोच्या सेटवरच बुधवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते आणि खासदार परेश रावल यांच्या आगामी ‘वेलकम टू लंडन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बुधवारी कपिल शर्मा शोमध्ये येणार होते.

या भागाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच कपिलला अस्वस्थ वाटू लागले.

त्यामुळे चित्रीकरण रद्द करून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात आले. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*