कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका

0

आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.

अरविंद केजरीवालांवरच भ्रष्टाचाराचा आरोप होणं दु:खद असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

केजरीवालांवरील आरोपावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले की, “दिल्लीतल्या भ्रष्टाचारविरोधात लढाईमुळे केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण आज त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होणं दु:खद आहे.”

अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज केला.

सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला होता.

LEAVE A REPLY

*