कनगरच्या महिलांचा दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या

0

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले. मात्र, तरीही डिग्रसला दारूबंदी झाली नाही. डिग्रसला महिलांच्या दारूबंदीच्या आंदोलनाची मशाल अद्यापही पेटती असतानाच आता तालुक्यातीलच कनगर येथील महिलांनी दारूबंदीचा वणवा पेटविला आहे.

 

काल कनगर येथील संतप्त झालेल्या महिलांनी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना चांगलेच धारेवर धरून दारूबंदी व जुगारबंदीची मागणी केली. अवैध धंदे व दारूबंदी, जुगारबंदी करण्याचे सुमारे 101 महिलांनी पोलिसांना निवेदन दिले.

 
दरम्यान, कनगर येथील महिला सरपंच रंजना बर्डे यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी हे आंदोलन केले. संतप्त महिलांनी सुमारे एक तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

 
आंदोलनात सरपंच रंजना बर्डे यांच्यासह मालन पवार, सुंदरबाई बर्डे, लक्ष्मीबाई दिवे, अनिता घाडगे, कौसाबाई जाधव, शशिकला जाधव, छबुबाई जाधव, रेखा बर्डे, अलकाबाई बर्डे, आसराबाई जाधव, मीना गोसावी, सविता दिवे, सुमन घाडगे, उषा दिवे, ज्योती ओहोळ, सविता उबाळे, रेखा उबाळे, पुष्पा उबाळे, गयाबाई माळी, सुरेखा बर्डे, मनीषा गोसावी, ज्योती गोसावी, नंदाबाई आहेर, सोनाली गोसावी, मीना बडे, पल्लवी रूपवते, संगीता विधाटे, भीमाबाई दिवे, चंद्रकला दिवे, विमलबाई दिवे, कल्पना दिवे, सुमन दिवे, मनीषा दिवे, सुनीता दिवे, भारती दिवे, लता दिवे, छाया जाधव, सीता जाधव, हिराबाई जाधव, पूजा जाधव, निशा जाधव, नंदा घाडगे, ज्योती उदावंत, दुर्गा आंबेकर, बदामबाई गवळी, सुशीला भोसले, खैरूबी शेख, जोहदा आत्तार, जायदा आत्तार, नर्मदा गाडे, तमीज शेख, लीला सोंडे, भीमाबाई वरघुडे, चंदा हारदे, मीराबाई कुटे, यमुना कुटे, रुक्मिणी कुटे, शारदा प्रधान, कडूबाई पवार, छाया गाढे, सुभद्रा गाढे, कडूबाई गाढे, यमुनाबाई गाढे, सीमा प्रधान, पूजा गायकवाड, गीता दुधाडे, आशाबाई घाडगे, शीतल दिवे, सविता पावसे, कविता पावसे, संगीता खाटेकर, सीमा घाडगे, सुनीता जाधव, तारा बर्डे, अनिता बर्डे, पूजा गोसावी, अलका बर्डे, आदींसह 101 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*