कत्तलखान्यावर छापा : चौघांवर कारवाई, एक लाखांचा मुद्देमाल ताब्यात

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहारातील कोठला परिसरात बुधवारी (दि.9) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकला. यात तिघांना अटक करण्यात आली असून एक पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐनुर रफीक कुरेशी, ओवेज रफीक कुरेशी (रा. सुभेदारगल्ली), फईम सिराज शेख (रा. सर्जेपुरा), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर वसीम रफीक कुरेशी (रा. वार्ड. नं.2 श्रीरामपुर) हा पसार आहे.
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेल कुरेशीच्या पाठीमागे एका बंदिस्तजागेत एका वाहनात मांस भरीत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना घटनास्थळी छापा टाकण्याचे आदेश दिले. पवार यांच्या पथकाने छापा टाकून एम. एच 12 केपी 4410 हा टेम्पो ताब्यात घेतला असता त्यात बाराशे किलो मांस मिळून आले. ही कारवाई पवार यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वाती देवाडकर, आर. सी. खोडे, मंगेश खरमाळे, दीपक राहकले, दीपक जाधव, संजय काळे यांनी केली.

पोलीसाचे नगरसेवकाला वरदान

यापुर्वी पोलिसांनी झेंडीगेट परिसरात कत्तलखान्यावर छापे टाकले आहेत. या गुन्ह्यात जागा मालकावर कारवाई करण्यात आली असून अटक देखील केली आहे. मात्र झेंडीगेट परिसरात जागामालक एक नगरसेवक असल्यामुळे अज्ञात जागामालक म्हणून कारवाई करण्यात येते. नंतर या गुन्ह्यात आरोपी मिळून आला नाही. किंवा निष्पन्न झाला नाही असे दाखविले जाते.

LEAVE A REPLY

*