Type to search

आरोग्यदूत

कंबरदुखीसाठी ओझोन थेरपी

Share

आधुनिक जीवनशैली मानवी शरीरामध्ये अनेक आजारांना निमंत्रण देते. बैठे काम, व्यायामाचा अभाव, निकृष्ट आहार यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. कंबरदुखी हा त्यातला सर्वाधिक आढळणारा आजार, स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. दुर्लक्ष केल्यामुळे पाठीच्या मणक्यावर याचा तीव्र परिणाम होतो. कंबरदुखीची अनेक कारणे असू शकतात. त्यातील स्लिप डिस्क म्हणजे दोन मणक्यांमधील चकती बाहेर येणे, हे एक महत्त्वाचे कारण आहे. ही चकती मज्जारज्जूच्या नसांवर दबाव टाकते व नसेच्या आजूबाजूस सूज येते. अशावेळी रुग्णास कंबरदुखीच्या असह्य वेदना होतात. बरेचदा हे दुखणे पायापर्यंत जाते. मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे, जळजळ होणे अशी लक्षणे त्या भागात दिसू लागतात. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत कुणालाही हा आजार होऊ शकतो. गोळ्या, औषधे घेऊन वेदना कमी होतात; परंतु नसेवरील दबाव कमी होत नाही व रुग्णास पुन्हा पुन्हा वेदना होतात. अशा परिस्थितीत ओझोन थेरपी लाभदायक ठरू शकते.

ओझोन म्हणजे काय?
वातावरणात ओझोन वायू आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवतो. हे आपणास माहीत आहेच. एका विशिष्ट मशिनीद्वारे ऑक्सिजनचे (ज2) रुपांतर मेडिकल ओझोन (ज3) मध्ये केले जाते. विविध आजारांवर विविध पद्धतीने ओझोनचा वापर केला जातो. ओझोन वायू दोन मणक्यांमधील चकतीमध्ये इंजेक्शनद्वारे सोडला जातो. हा वायू डिस्कमधील टॉक्सिन्स (ढेुळपी) निकामी करतो. तसेच ओझोन डिस्कमधील द्रवरुप पाण्यात विरघळतो. त्यामुळे डिस्क आकुंचन पावते व नसेवरील दबाव कमी होतो.

ओझोन थेरपी रुग्णाच्या दृष्टीने सुरक्षित आहे का?
ही एक शस्त्रक्रिया नाही. प्रशिक्षित डॉक्टरद्वारे सी. आर्म (उ-ईा) शिनने अगदी अचूक ही प्रक्रिया केली. डिस्क लहान करण्यासाठीच्या पद्धती जसे कॉन्व्हेन्शनल ओपन सर्जरी, मायक्रो सर्जरी, एन्डॉस्कोपिक डिसेक्टॉमी यांच्या तुलनेत ओझोन थेरपी नॉनइन्व्हॅसिव्ह आहे. त्यामुळे या थेरपीचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पाश्चात देशांमध्ये स्लिप डिस्कच्या उपचारासाठी पहिली निवड ओझोन थेरपीचीच केली जाते.

ओझोन थेरपीचे लाभ
यामध्ये चिरा द्याव्या लागत नाहीत. जखम होत नाही. पूर्ण भूल देण्याची गरज नाही. जागेवरची भूल पुरेशी असते. हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ राहण्याची गरज नाही. रुग्णाला आपल्या कामावर लवकर रुजू होता येते.

ओझोन थेरपीनंतर घ्यावयाची काळजी
रुग्णाने 48 तासांसाठी संपूर्ण आराम करावा. महिनाभर जड वस्तू उचलू नये. वाकून काम करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मणक्याचे व्यायाम सुरू करावेत. अशा या ओझोन थेरपीने आपण मणक्याची शस्त्रक्रिया टाळू शकतो.
डॉ. निलेश लोढा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!