Type to search

नंदुरबार

कंत्राटी कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन

Share

शहादा| ता.प्र. – शहादा गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा विविध मागण्या असून त्या मान्य न झाल्यास (ता.१६) सोमवारी कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.या मागणींचे निवेदन खा.डॉ.हिना गावीत यांना दिले.

जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता याबाबत काम करण्यासाठी गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता)या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे .सदर कक्षांतर्गत केंद्र व राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन, पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम आणि पाणी व स्वच्छता विषयक योजना ग्रामीण भागात राबविण्याचे कार्य गट संसाधन केंद्र या कक्षातील गट समन्वयक व समुह समन्वयक करतात परंतु मिळणार्‍या अत्यंत तुटपुंज्या मानधन व इतर मागण्यांबाबत (ता.४) पासून राज्यस्तरावर काम बंद आंदोलन सुरू आहे .

परंतु आजपर्यंत शासनाने कोणताही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत गट संसाधन केंद्र ( पाणी व स्वच्छता) या कक्षेतील कार्यरत असलेल्या सर्व गट समन्वयक व समुह समन्वयक कंत्राटी कर्मचारी दि.१६ ला जिल्हा परिषदेसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार आहेत असे संघटनेतर्फे कळविण्यात आले.या आहेत मागण्या कायम स्वरूपी शासकीय सेवेत कायम करणे , इतर राष्ट्रीय कार्यक्रमाशी सुसंगत मानधन वाढ करण्यात यावी, इतर योजनेतील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रमाणे आरोग्य विमा लागू करण्यात यावा, जिल्हा बाह्य व जिल्हा अंतर्गत बदली करण्यासाठी परवानगी मिळावी, जिल्हा कक्षात कार्यरत सल्लागार यांचा प्रमाणे प्रोत्साहन भत्ता व प्रवास भत्ता मिळावा, अंशकालीन दर्जा लागू करावा आदी मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे

.याबाबतचे निवेदन खा.डॉ.हिना गावित यांना देण्यात आले.यावेळी कर्मचारी अनिल कोळी, पुरुषोत्तम बाविस्कर, यशवंत गांगुर्डे , अविनाश बागुल, युवराज चौधरी, दिलीप गावित, अरुण शेंडे, अर्जुन कडवे, दारासिंग वसावे ,प्रिंतेश पाटील उपस्थीत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!