औषध विक्रेत्यांचा आज बंद

0
वलवाडी / ‘ऑनलाईन फार्मसी’ला केमिस्ट बांधवांनी कडाडून विरोध केला असून या निषेधार्थ उद्या दि.30 मे 2017 रोजी औषधे विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सुमारे 55 हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे धुळे जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात औषध विक्रेत्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.
राज्यात ई फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशिरपणे व्यवसाय सुरु असून याद्वारे अनेक धोकादायक औषधांची विक्री केली जात आहे.
उच्च न्यायालयाने जनहित याचीकेच्या सुनावणीदरम्यान ऑनलाईन औषध विक्रीबाबत अनेकदा गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
तरीही राज्य सरकार व प्रशासन याबाबत गंभीर नाही. आता देशात ई फार्मसी व ई पोर्टल लागु करण्याची योजना आखली जात असल्याने राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्या आहेत.

या आंदोलनात देशभरातील आठ लाख औषध विक्रेते सहभागी होतील. जिल्ह्यातील शेकडो विक्रेते बांधवांना आंदोलनात सहभाग देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बंदमध्ये सहभागी होवून आपली भूमिका सरकारपर्यंत पोहचवावी असे आवाहन केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गिंदोडीया, जिल्हा सचिव अनिल चौधरी, तालुका अध्यक्ष आशिष रेलन, तालुका सचिव विजय चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*