औषधनिर्माणशास्त्राचा निकाल जाहीर

0
शहादा । दि.14 । ता.प्र.-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या प्रथम व द्वितीय वर्ष पदवीका औषधनिर्माणशास्त्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विद्याथ्यार्ंनी भरघोस यश संपादन केले आहे.
मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र पदवीका विद्यालयाचा प्रथम वर्षांचा निकाल 80 टके तर द्वितीय वर्षांचा निकाल 93 टके लागला आहे. प्रथम वर्षात पाटील गणेश रामेश्वर 77.36 टके प्रथम, पाडवी भारती चामसिंग 75.09 टक्के द्वितीय, हासमानी अल्फीया जिकर 73.09 टके तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
द्वितीय वर्षात धनकानी मोनिका उत्तम 84.09 टके प्रथम, चौधरी रोहिणी ब्रिजलाल 74.80 टके द्वितीय, अहिरे एकता महेंद्र 74.50 टके तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.

यशस्वी विद्याथ्र्याचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष किशोरभाई पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, पी.आर.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पवार यांनी कौतूक केले आहे. यशस्वी विद्याथ्र्यांना विभाग प्रमुख प्रा. योगेश रोकडे, प्रा. राहुल लोहारे, प्रा. गिरीश बडगुजर, प्रा. माधूरी कान्हेरे, प्रा. चेतन पटेल, प्रा. ज्योत्सना खेडकर, मोहन बडोदेकर, सुरेश पाटील, संजय पाटील, पुरुषोत्तम पाटील आदिंचे मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*