ओला कार धडकेतील महिलेचे पहाटे निधन

0

नाशिक, ता. २४ : जेहान सर्कल येथे ओला कॅबने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नीलिमा उर्फ मोना अजय चौधरी (वय ४० ) यांचे आज पहाटे शहरातील खासगी रुग्णालयात निधन झाले.

दी पिच ट्री बुटीकच्या त्या संचालिका होत्या. त्यांच्या पश्चात पती अजय चौधरी, मुलगा अवनिष व मुलगी ईशा असा परिवार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद हे त्यांचे मूळ गाव असून त्यांच्या निधनावर लेवा सखी मंडळाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

*