ओपन स्पेस ताब्यात घेण्याची हालचाल – आयुक्तांनी घेतला नगररचना विभागाकडून आढावा

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहरातील तब्बल ३९७ ओपन स्पेस मनपाने सामाजिक सेवाभाविक संस्थांना दिल्या आहेत. परंतु १८४ अविकसीत आणि २१३ विकसीत ओपन स्पेसपैकी ज्यांनी अटी-शर्तीचे भंग केले आहे. अशा जागा ताब्यात घेण्याचे हालचाल प्रशासकीय पातळीवरुन सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगररचना विभागातील अभियंत्यांची बैठक घेवून आढावा घेतला आहे.

मनपा हद्दीतील ३९७ ओपन स्पेस समाजोपयोगी वापरासाठी सामाजिक संस्थांना दिल्या आहेत. यातील १८४ अविकसीत तर २१३ विकसीत ओपन स्पेस आहेत. परंतु सामाजिक संस्थांकडून व्यवसायिक वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनीही ओपन स्पेस ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. आता पुन्हा हालचाल सुरु झाली आहे. १८४ अविकसीत ओपन स्पेस ताब्यात घेण्याबाबत आयुक्त जीवन सोनवणे यांनी महासभेपुढे प्रस्ताव दिला आहे.

तर २१३ विकसीत ओपन स्पेस मधून नियमांचे उल्लंघन करणार्‍या संस्थांकडून ओपन स्पेस ताब्यात घेण्यासाठी सायंकाळी नगररचना विभागाच्या अभियंत्यांकडून आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*