ऑस्ट्रेलिया : सिडनीमध्ये विमानात बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट उधळून लावला; चार जणांना अटक

0

ऑस्ट्रेलियातील सिडनीत पोलिसांनी दहशतवाद्यांचा विमानात बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट उधळून लावला आहे.

याप्रकरणात चार जणांना अटक केली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस आयुक्त एंड्रयू कॉल्विन आणि पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली.

अटक केलेले चौघे जण हे विमानाच्या आतमध्ये स्फोट घडवून विमान पाडण्याचा कट रचत होते असा दावा पोलिसांनी केला आहे.

कोणत्या विमानात ते स्फोट घडणार होते, विमानतळाच्या आतमध्ये बॉम्ब कसा नेणार होते, कधी आणि कुठे हा स्फोट घडवण्याचा कट होता, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून चौघांची कसून चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.

हे चौघेही इस्लामचे कट्टर समर्थक होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*