Type to search

क्रीडा

ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत

Share

लॉडर्स । टीम ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला विजयासाठी दिलेले 286 धावांचे आव्हान पेलता आले नाही. त्यांचा अख्खा संघ 221 धावांमध्येच गारद झाला. दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.

इंग्लंडला श्रीलंका, पाकिस्ताननेही पराभूत केले होते. त्यांचा विश्वचषकातील हा तिसरा पराभव ठरला. कर्णधार फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी 89 धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या 5 बळींमुळे इंग्लंडला केवळ 221 धावांपर्यंतच मजल मारता आली. 12 गुणांसह उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे, तर पराभवामुळे इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत भक्कम सलामी दिली. 123 धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने 61 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा 23 धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने मात्र दमदार शतक ठोकले. त्याने 116 चेंडूत 100 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली. पण दुसर्‍या बाजूने त्याला कोणी साथ देऊ शकले नाही. धोकादायक मॅक्सवेल 12 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टॉयनीसदेखील धावचीत होऊन माघारी परतला. अखेर शेवटच्या टप्प्यात स्मिथ फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 38 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 285 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून वोक्सने 2 तर आर्चर, वुड, स्टोक्स आणि अली यांनी 1-1 बळी टिपला.

तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीची संधी दिली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकात 7 बाद 285 धावा केल्या. कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सर्वाधिक धवांची खेळी केली. फिंचने116 चचेंडूत 11 चौकार 2 षटकारांसह 100 आणि वॉर्नरने 61 चेंडूत 6 चौकारांसह 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करत पहिल्या बळीसाठी अ‍ॅरॉऩ फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने 123 धावा केल्या. या जोडीला तोडण्यास मोईन अलीला यश आले. त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला 53 धावांवर बाद केले. त्यानंतर उस्मान ख्वाजा मैदानात आला. अ‍ॅरॉन फिंच आणि ख्वाजा या दोघांनी दुसर्‍या बळीसाठी 50 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का 173 धावसंख्या असतना उस्मान ख्वाजा 23 धावांवर बाद झाला.

यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक टप्प्याने गडी गमावले. ख्वाजानंतर एकाही खेळाडूला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. सलामीवीरांचा अपवाद वगळता, स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरी या दोघांनी 38 धावा केल्या.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 2 तर जोफ्रा आर्च्रर, मार्क वूड, बेन्स स्टोक्सने आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला.

ऑस्ट्रेलिया : 285/7 (50 षटकांत)

फलंदाजी : अ‍ॅरॉन फिंच (100), डेव्हीड वॉर्नर (53), उस्मान ख्वॉजा (23), स्टीव्ह स्मिथ (38), ग्लेन मॅक्सवेल (12), मार्कस स्टोयनिस (8), अ‍ॅलेक्स कॅरी (38*), पॅट कमिन्स (1), मिशेल स्टार्क (4*), अतिरिक्त : 4

गोलंदाजी : ख्रिस वोक्स (10-0-46-2), जोफ्रा आर्चर(9-0-56-1), मार्क वुड (9-0-59-1), बेन स्टॉक्स (6-0-29-1), मोइन अली (6-0-42-1), आदिल रशीद (10-0-49-0)

इंग्लंड : 221/10 (44.4 षटकांत) फलंदाजी : जेम्स विन (0), जॉनी बेअर स्ट्रो (27), जो रुट (8), इऑन मॉर्गन (4), जॉस बटलर (25), ख्रिस वोक्स (26), मोईन अली (6), आदिल रशिद (25), जोप्रा आर्चर (1), मार्क वुड 1*) अतिरिक्त : 9गोलंदाजी : जेसन बेहरनडॉर्फ (10-0-44-5), मिशेल स्टार्क (8.4-1-43-4), पॅट कमिन्स (8-1-41-0), नेथन लियॉन (9-0-43-0), मार्कस स्टोयनिस (7-0-29-1) ग्लेन मॅक्सवेल (2-0-15-0)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!