ऑस्ट्रेलियाचा पाकवर आठ गडी राखून विजय

0
शारजाह । भारताविरुद्धची टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केल्यानंतर ऑॅस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानविरुद्धही दमदार सुरुवात केली आहे. ऑॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कांगारूंनी 8 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ऑॅस्ट्रेलिया 5 एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

शारजाह क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाक कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हॅरीस सोहीलने केलेल्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने 5 गडी गमावत 280 धावा केल्या. हॅरीससह शान मसुदने 40 तर उमर अकमल 48 धावांची खेळी केली. ऑॅस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलने 2 तर झाय रिचर्डसन, नाथन लायन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

पाकने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑॅस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 व्या षटकात विजय मिळवला. कांगारू कर्णधार अ‍ॅरोन फिंचने 116 धावांची शतकी खेळी साकारली. तर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शॉन मार्शने नाबाद 91 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणार्‍या फिंचला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.. हॅरीस सोहीलने केलेल्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने 5 गडी गमावत 280 धावा केल्या होत्या.मात्र त्या कामा अल्या नाहीत.

LEAVE A REPLY

*