ऑस्ट्रेलिअन ओपन बॅडमिंटन सुपर सिरिज : भारताच्या किदंबी श्रीकांतला विजेतेपद, चीनच्या लाँग चेंगचा केला पराभव

0

ऑस्ट्रेलिअन ओपन बॅडमिंटन सुपरसिरिजच्या फायनलमधे भारताच्या किदंबी श्रीकांतनं चीनच्या लाँग चेंगचा पराभव केला.

किदंबी श्रीकांतनं चीनच्या लाँग चेंगचा 22-20, 21-16 असा पराभव केला आहे.

किदंबी श्रीकांतचं हे यावर्षातलं दुसरं विजेतेपद आहे. यापूर्वी इंडोनेशिअन ओपन सुपरसिरीजही त्यानं जिंकला होता.

किदंबी श्रीकांतनं हरवलेल्या लाँग चेंगनं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे.

24 वर्षीय किदंबी श्रीकांत हा गोपीचंदचा विद्यार्थी आहे. पी. व्ही. सिंधू, बी साईप्रणित यांच्यासह किदंबी श्रीकांत जागतिक पातळीवर कमालीची कामगिरी करताना दिसत आहे.

श्रीकांतने पहिल्यांदाच चेन लाँगवर मात केली आहे. सहा सामन्यानंतर श्रीकांतला हे यश मिळाले आहे. किदम्बी श्रीकांत सध्या फॉर्मात असून सलग तिसऱ्या सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा श्रीकांत पाचवा खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

*