ऑस्टे्रलियन संघाची घोषणा : दुबईत होणार लढत

0
सिडनी । ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने संयुक्त अरब अमिरात येथे होणार्‍या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी अ‍ॅरॉन फिंचला संघात स्थान दिले आहे. फिंचचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे. त्याच्यासोबत पीटर सिडललाही संधी देण्यात आली आहे. सिडलने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये खेळला होता.

31 वर्षीय अ‍ॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत टी-20 आणि वनडेमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. फिंच हा ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचा कर्णधार असून तो त्याच्या वादळी खेळीसाठी जगप्रसिद्ध आहे. तब्बल 31 व्या वर्षी फिंच ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

फिंचने 73 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 4 हजार 338 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धुरा ही टिम पेन याच्याकडे सोपवण्यात आली आहे. दोन वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करणारा पीटर सिडल ऑस्ट्रेलियासठी 62 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 211 विकेट आपल्या नावावर केले आहेत. प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड आणि पॅट केमिन्स जखमी झाल्यामुळे सिडलला संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेसाठी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि पीटर हँड्सकॉम्बला ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट करण्यात आले नाही.

टिम पेनच्या नेतृत्वात या कसोटी मालिकेत खेळणार्‍या ऑस्ट्रेलिया संघात मिशेल नेसेर, ब—ेंडन डोगेट आणि फलंदाज मार्नस लाबुशाग्नेला पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आले. सीएचे निवडकर्ता ट्रेवर हॉन्सने म्हटले पीटर आणि ग्लेनविषयी आम्ही फलंदाजी ग्रुपवर चर्चा करताना चर्चा केली होती परंतु आम्हाला परिस्थिती आणि आगामी मालिकेत मिळणार्‍या आव्हनाला लक्षात ठेऊन निर्णय घ्यायचा होता. हॉन्सने म्हटले की, फिंच एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला कसोटी क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शेफील्ड शील्डमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले.

ऑस्ट्रेलियन संघ
टिम पेन (कर्णधार), एश्टन अगर, अ‍ॅरॉन फिंच, ट्रॅविस हेड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा , मार्नस लैबसचगने, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, शॉन मार्श, मायकेल नेसर, मॅट रेनशॉ, पीटर सिडल, मिशेल स्टार्क,ब—ेंडन डॉगेट.

LEAVE A REPLY

*