ऑनलाईन बेटिंगला क्रीडा मंत्री विजय गोयल यांचा विरोध

0

क्रीडा मंत्रालयाकडून ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याबद्दल शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या असून क्रीडा मंत्रालयाकडून अनेकांसोबत चर्चा करण्यात येत आहे. याचा मुसदा तयार करण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील, अशी माहिती आहे.

क्रीडा मंत्रालयाने ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी ब्रिटनच्या क्रीडा मंत्रालयाची मदत मागितली आहे. ब्रिटनमध्ये बेटिंगला अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाचे सचिव इनजेटी श्रीनिवास सध्या इंग्लंडमध्ये असून ते सामंजस्य करारवर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. या करारात क्रीडा सामन्यांवरील ऑनलाईन बेटिंगचा समावेश आहे. ‘ब्रिटनमधील बेटिंगचे नियम सर्वाधिक प्रभावी आहेत. ब्रिटनमधील नियमांचा आणि यंत्रणेचा अभ्यास करुन ती भारतात राबवता येईल का, याबद्दलचा अभ्यास करण्यात येईल,’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

ऑनलाईन बेटिंगला अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही, मी त्याच्या विरोधात असलो तरी अंतिम निर्णय सरकार घेईल – विजय गोयल, क्रीडा मंत्री

दोहास्थित आंतरराष्ट्रीय क्रीडा सुरक्षा केंद्राच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे. भारतात सध्या फक्त अश्वशर्यतीवरील बेटिंगच अधिकृत आहे, ज्याला जीएसटीमध्ये 28 टक्के टॅक्स लावण्यात आला आहे.

बेटिंग अधिकृत केल्यामुळे मिळालेल्या उत्पन्नाचा वापर खेळांसाठी आणि क्रीडापटूंना देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी केला जाऊ शकतो,’ अशी चर्चा या बैठकीत झाली होती.

LEAVE A REPLY

*