Type to search

Breaking News जळगाव

अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार युवकांना योजनेचा लाभ

Share

जळगाव – 

राज्य शासनातर्फे  अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळातर्फे आतापर्यत जिल्हयातील १७८ मराठा कुणबी सुशिक्षीत बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी विविध बॅकांतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

तसेच मुद्दल व व्याजाची परतफेड नियमित हप्त्यात परतफेड केलेली आहे अशा युवकांना व्याज रकमेच्या अनुदानाचा परतावा देखिल करण्यात आला असल्याची माहिती महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

 

जिल्हयातील जळगाव जनता,चिखली बॅक शाखा जामनेर यांचेसह अन्य १३ राष्ट्रीयकृत बॅकांकडून कर्जपुरवठा करण्यात आला असून लाभार्थ्यांना १०कोटी २५ लाख ७७हजार ३२६रूपये कर्ज वाटप झाले असल्याचे सांगीतले.

 

तर या १७८ लाभार्थ्यापैकी ९७लाभार्थ्यांना ४१लाख, ६१हजार ४७३ रू.चा परतावा त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ऑनलाईन कर्जपुरवठा   दलाल वा मध्यस्थ विरहित प्रक्रिया असल्याने महामंडळाचा पारदर्शी कारभार आहे,त्यामुळे थकबाकीदार रहाण्याचे प्रकार नाहीत असेही त्यांनी बोलतांना सांगीतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!