ऑनलाईन नोंदणीतून ‘आरटीओ’ला २४ कोटी निधी

0

नाशिक | दि. ३ प्रतिनिधी – प्रादेशिक परिवहन विभाग (आटीओ) ‘वाहन ४.०’ या ऑनलाईन वाहन नोंदणी प्रणालीच्या माध्यमातून दोन महिन्यात विभागाला २४ कोटी ४५ लाख २३ हजार ४२५ रुपयांचा महसूल मिळाला.

त्याचबरोबर १५ कोटी ८३ लाख ६५ हजार २३१ रुपये रोख स्वरुपात मिळाले असून असा एकूण ४० कोटी २८ लाख ८८ हजार ६५६ रुपये विक्रमी महसूल जमा झाला आहे. कार्यालयात १८ जानेवारीपासून ही ऑनलाईन अर्ज प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

सुरळीत कामकाज, विनामध्यस्थ आणि तात्काळ काम होत असल्याने नागरिकांकडून या प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळत असून शासनाच्या तिजोरीतही मोठी भर पडत आहे. आरटीओ कार्यालयात एकूण ७२ हजार ४५४ अर्ज दाखल झाले होते.

त्याद्वारे ४०.२८ कोटींपैकी २४.४५ कोटी म्हणून ६० टक्के महसूल हा कॅशलेस पद्धतीने जमा झाला आहे. कार्यालयात सर्वच कामकाज व वाहन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू असून यापुढे वाहन हस्तांतर, बँक बोजा, वाहनांची पुनर्नोंदणी व इतर कामेदेखील ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.

ज्या नागरिकांकडे इंटरनेट सुविधा नसेल त्यांना नागरी सेवा केंद्र सीएससी केंद्राद्वारे अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा
ऑनलाईन प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रणालीमुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे. २ महिन्यांतच विक्रमी महसूल जमा झाला. जनजागृती करून यापुढे तो आणखी वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

*