…हे तर विरोधकांचे षडयंत्र – आमदार सीमा हिरे

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बोलल्या आमदार सीमा हिरे

0

नाशिक : निवडणुक काळात उमेदवारी वाटपावरून भाजप अंतर्गत घमासान सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला.

या क्लिपमुळे ऐननिवडणुकिच्या तोंडावर भाजपची पुरती कोंडी झाली. हा वाद शमतो न शमतो तोच आता भाजपच्याच आमदाराने भाजप उमेदवारास मतदान न करण्याचे केलेल्या आवाहनाची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पराभुत उमेदवारांनी आमदारांविरोधात थेट मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडेच धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार हिरे यांच्यावर झालेल्या आरोपांनर त्या म्हणाल्या,  हे तर विरोधकांचे षडयंत्र आहे याबाबत प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. तसेच आधी माझ्या परिसरात फक्त एकच भाजपचा नगरसेवक होता पण आता २१ नगरसेवक झाले आहेत त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून कुठल्या न कुठल्या माध्यमातून फक्त विरोध करण्याचे काम विरोधक करत असल्याचे आमदार हिरे यांनी म्हटले आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. पण भाजप पक्षातच अंतर्गत वाद असून या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

LEAVE A REPLY

*