ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमधून चाहत्यांचा काढता पाय; आयोजकांकडे पैसे परत करण्याची मागणी

0

ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमधून नाराज होऊन युकेमधील वेम्बली शहरात त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट केला आणि हा कॉन्सर्ट संपण्यापूर्वीच हिंदी भाषिक चाहत्यांनी काढता पाय घेतला.

रेहमानने फक्त तामिळ भाषेतील गाणी गाऊन इतर भाषिकांना धोका दिल्याचा त्यांचा आरोप आहे.

यासंदर्भात ट्विटरवर चाहत्यांनी राग व्यक्त केला असून #ssearena आणि #wembley हे हॅशटॅग सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने ती सर्वांवर थोपवू शकत नाही असे तामिळ लोकांचे म्हणणे आहे.

काही चाहत्यांनी तर आयोजकांकडे पैसे परत करण्याची मागणी केलीये. सोशल मीडियावर तामिळ भाषिक आणि हिंदी भाषिक रेहमानच्या चाहत्यांमध्ये ‘ट्विटर युद्ध’ सुरू झाले.

LEAVE A REPLY

*