एसबीआयमध्ये फाटलेल्या नोटा बदलल्यास शुल्क लागणार

0

भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करण्‍याची तयारी केली आहे.

जीर्ण झालेल्या तसेच फाटलेल्या नोटा बॅंकेतून बदलणार्‍या ग्राहकाकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बचत खात्यातून पैसे काढणार्‍या खातेदारांकडूनही वर शुल्क आकारण्याची तयारी बॅंकेने केली आहे.

विशेष म्हणजे बँकेचे नवे सेवा शुल्क एक जूनपासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नोटा बदलल्यास लागेल शुल्क…
फाटलेल्या तसेच जीर्ण झालेल्या नोटा बदलण्यासाठी बॅंक 2 ते 5 रुपये शुल्क आकारणार आहे. 20 पेक्षा जास्त आणि 5000 हजार रुपये मुल्यांच्या नोटा बदलल्यास बँक शुल्क आकारणार आहे.

– फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा 20 पेक्षा कमी आणि 5000 रुपये मुल्य नसलेल्या असतील, तर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

बचत खात्यातून पैसे काढणे महागणार…
– बँक आपल्या बचत खातेधारकांच्या सेवा शुल्कात वाढ करण्याच्या विचारात आहे. यानुसार फ्री कॅश विद्ड्रॉल करण्याची लिमिट 4 राहील. यात एटीएमद्वारा करण्‍यात आलेल्या व्यवहाराचाही समावेश असेल. याचा अर्थ असा की, एखाद्या खातेधारकाने 4 पेक्षा जास्तवेळा बँकेतून व्यवहार केल्यास त्याला सेवा शुल्क आकारण्यात येईल. 5 व्या व्यवहारापासून प्रति व्यवहार 20 रुपये शुल्क द्यावे लागेल.
– खातेदाराने एसबीआयच्या एटीएममधून व्यवहार केल्यास त्याला प्रति व्यवहारावर 10 रुपये शुल्क द्यावे लागेल.
– एक जूनपासून बॅंक केवळ रुपे डेबिट कार्डवर विनाशुल्क सेवा देईल. मास्टर आणि व्हिसा कार्डवर बॅंक सेवा शुल्क आकारेल.

LEAVE A REPLY

*