‘एसटीएफ’कडून सनी लिओनीला क्लीन चिट

0

ऑनलाइन क्लिकच्या नावाखाली सात लाख लोकांना ३७०० कोटी रुपयांचा गंडा घातलेल्या घोटाळेबाजीचा आरोप असलेला व्यावसायिक अनुभव मित्तल याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंतवणुकदारांचे ३० लाख रूपये खर्च केले होते.

त्याने त्याच्या वाढदिवसाला सनी लिओनीलाही बोलावले होते.

सदर प्रकरणात सनीला पार्टीमध्ये बोलावण्यासाठी तिला किती पैसे देण्यात आले याची स्पेशल टास्क फोर्स चौकशी करत आहे.

एसटीएफचे पोलीस अधीक्षक राजीव नारायण मिश्र यांनी सांगितले की, सनी लिओनीला किती पैसे देण्यात आले याबद्दल चौकशी सुरू आहे.

पण या संपूर्ण प्रकरणात सनीचा काहीच दोष नाही.

जर तिला पार्टीमध्ये कोणी बोलवत असेल तर यात तिचा काही दोष नाही. दोष ज्याने ही पार्टी आयोजित केलेली त्याचा आहे.

LEAVE A REPLY

*