Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

एरंडाच्या बिया खाल्ल्याने 17 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share
पारनेर तालुक्यातील घटना, लोणीत उपचार सुरू
पारनेर (तालुका प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील काळेवाडी (देसवडे) येथील प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या 17 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या सर्व विद्यार्थ्यांना लोणी व साकूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी चार वाजता सुट्टीच्या दरम्यान घडला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खडकवाडी व पोखरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने या विद्यार्थ्यांना उपचारार्थ लोणी व साकुर येथे हलविण्यात आलेे. त्यामुळे बेजबाबदार शिक्षकांसह, वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

या प्राथमिक शाळेतील विष बाधीत झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये धनश्री दताञय तोडकर, ज्ञानेश्वर पांडुरंग गुंड, समृध्दी पांडुरंग गुंड, ज्ञानेश्वर संतोष शेलार, ओंकार विठ्ठल टेकुडे, यश नवनाथ दाते, यश विनायक तिकडे, सिध्दार्थ बंडु औटी, राणी भाऊसाहेब दाते, महेश भानुदास तोडकर, अक्षय शिवाजी गुंड, चित्रा सुरेश शिंदे, आदित्य रोहिदास दाते, श्रावणी संतोष टेकुडे, लंकेश जिजाभाऊ टेकुडे, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!