एम. जी रोडवर झाड कोसळले

0

नाशिक : शहरातील एम जी रोडवरील रेड क्रॉस सिग्नल नजीक सायंकाळच्या सुमारास हवेमुळे एक झाड अचानक कोसळले त्यामुळे काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती.

अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी झाड हटविल्याने काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली.

रेडक्रॉस सिग्नल जवळ रस्त्यावरील डिव्हाईडरवर अनेक जुनी झाडे आहेत. वारा आल्यामुळे कुजलेले झाड अचानक जमिनीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

*