एमपीडीएचा आरोपी घनश्याम पाटील फरार घोषित

0

जळगाव |  प्रतिनिधी :  अमळनेर येथील एमपीडीएचा आरोपी घनश्याम ऊर्फ श्यामकांत पाटील यास जिल्हा प्रशासनाने फरार घोषीत केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. दरम्यान दि. १७ एप्रिलपर्यंत पोलिस अधिक्षकांसमोर हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

अमळनेर येथील न्यु पटवारी कॉलनीतील रहीवासी वाळुमाफिया घनश्याम ऊर्फ श्यामकांत जयवंतराव पाटील याच्यावर जिल्हा प्रशासनाने फेबु्रवारी महिन्यान एमपीडीएची कारवाई केली होती. कारवाईचा आदेश बजावण्यापुर्वीच घनश्याम पाटील हा गायब झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. २७ रोजी घनश्याम ऊर्फ श्यामकांत पाटील यास फरार घोषीत केले आहे.

यासदर्ंभात पोलिस अधिक्षकांनाही सुचित करण्यात आले असुन प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाची प्रत त्याच्या घरावर चिकटवुन ती वाचुन दाखवण्याच्या सुचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. दरम्यान घनश्याम पाटील यास दि. १७ एप्रिलपर्यंत पोलिस अधिक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत.

घनश्याम पाटील हजर न झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार त्याची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*