एमपीएससीत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात प्रथम

0

नाशिक (प्रवीण खरे) ता. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून नाशिकच्या भूषण अहिरे याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

श्री अहिरे यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. भूषणचे आई सुनिता अहिरे वडील अशोक अहिरे हे दोन्हीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.

राज्यात प्रथम आल्यानंतर फेम थिअटरमागे श्री श्री रवीशंकर मार्गावर असलेल्या भूषणच्या घरी म्हणजेच ऋषीप्रसाद बंगल्यात जल्लोषाचे अन उत्साहाचे वातावरण होते. भूषण अहिरे हे अभिनंदनाचे फोन स्वीकारण्यात व्यस्त होते तर त्याचे आईवडीलही सर्वांशी  बोलण्यात मग्न होते.

परिवारासोबत भूषण अहिरे
परिवारासोबत भूषण अहिरे

मोठे यशोशिखर गाठल्याने सर्वांच्या चेहरयावर मनस्वी आनंद ओसंडून वाहत होता. याबाबत भूषणला अभ्यासाबाबत विचारले असता त्याने सांगितले की, मी दररोज दहा ते अकरा तास नियमित अभ्यास करत होतो.

कोणत्याही स्थितीत माझा दिनक्रम चुकत नव्हता. पूर्व परिक्षेनंतर मुख्य परिक्षेसाठी वेगळया प्रकारची तयारी मी केली. त्यासाठी काटेकोर नियोजन केले. त्या नियोजनाचा फायदा मला परिक्षेत झाला.

उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झाली आहे. याशिवाय राज्यात प्रथम येण्याचा बहुमानही मिळाला आहे. हे सर्व काही नियोजनामुळे शक्य झाले आहे. आयएएस बनण्याचे माझे स्वप्न असून त्यासाठी मी अजून जोमाने तयारी करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी देशदूतला दिली.

साता-याच्या पुनम पाटील मुलींमध्ये प्रथम आल्या आहेत. पुनम पाटीलएकूण ३४ मुलींचा अधिकारी म्हणून समावेश झाला आहे. त्यांची डीवायएसपी पदी निवड झाली आहे.

पुनम पाटील

LEAVE A REPLY

*