एमआयडीसीत भुरट्या चोर्‍यांचा बंदोबस्त करा !

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-जळगाव एमआयडीसीमध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्याने भुरट्या चोर्‍या वाढल्या आहेत. हाणामारी करुन लुटमारीच्याही घटना घडल्या असून त्यावर बंदोबस्त करण्याची मागणी उद्योजक पोलीस समन्वयक बैठकीत उद्योजकांनी केली.
एमआयडीसी मधील एच-10 पारलेजी कंपनीमध्ये उद्योजक पोलीस समन्वय बैठक झाली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अध्यक्षस्थानी होते.
डीवायएसपी सचिन सांगळे, पोनी. सुनिल कुराडे, एमआयडीसीमधील जिंदा असो.,चटई, दालमिल, इलेक्ट्रीकल्स, फुड प्रोडक्ट व इतर उद्योजक उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी उद्योजकांसोबत संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्यात.

यावेळी उद्योजकांकडून भुवनेश्वर सिंग, दिनेश राठी, ओमप्रकाश सिंग यांनी भुरट्यज्ञा चोर्‍या, हाणामारी, स्ट्रीट लाईट बंद, बी-सेक्टरमध्ये रोडवर मालवाहु वाहने रस्त्यात उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

यातुन वादही उद्भवत असल्याचे सांगितले. त्यावर बच्चन सिंह यांनी तत्काळ गस्त वाढविण्याच्या सुचना देवुन कार्यवाही करण्याचे सांगितले.

बच्चन सिंह यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करतांना त्यांचे कंपनीमध्ये उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, बालकामगार कंपनीमध्ये ठेवू नये, कंपनी परिसरात रात्रीचे वेळी पुरेसा प्रकाश असावा, कंपनी चालकांनी कामगारांचा संपुर्ण बायोडाटा कंपनीकडे असावा, कंपनीत काम करीत असलेल्या प्रत्येक कामगाराचे व रक्षकांचे चारित्र्य पडताळणी करुन घेण्याच्या सुचना बच्चन सिंह यांनी दिल्यात.

महिला काम करीत असलेल्या ठिकाणी महिलांच्यघा लैगिंक छळाच्या अनुषंगाने महिलांच्या अडीअडचणींसाठ कंपनीमध्ये विशाखा समिती स्थापन करावेत.

कंपनीमध्ये दहा पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या ठिकाणी कामगारांच्या अंतर्गत तक्रार निवारण कमीटी स्थापन करण्यात यावी.

तसेच खंडणी बाबत काही तक्रारी असल्यास पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन बच्चन सिंह यांनी केले.

LEAVE A REPLY

*