एफटीआयआयचे चित्रपटविषयक लघु अभ्यासक्रम सुरु

0

मुंबई/फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि सोमैया ग—ुप ऑॅफ इन्स्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत अभिनय, पटकथा लेखन आणि चित्रपट समीक्षा विषयक लघु कालावधीसाठीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

भारतातील सर्वात जास्त काळ चालणार्‍या आणि सर्वाधिक लोकप्रिय अशा सीआयडी मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक आणि एफटीआयआयचे माजी उपाध्यक्ष बी. पी. सिंग यांनी सोमैया विद्याविहारचे प्रमुख डॉ. राजन वेळूकर यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले.

एफटीआयआय पुणेचे संचालक भूपेंद्र कँथोला, के. जे. सोमैया विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जोशी, आणि एस. के. सोमैया विद्यामंदिरचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक यावेळी उपस्थित होते.

कॅनॉन इंडियाचे सूरज राणा देखील यावेळी उपस्थित होते.

हे अभ्यासक्रम 30 मे पर्यंत सुरु राहणार आहेत. विशेष सत्राद्वारे चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीचे मार्गदर्शनही यादरम्यान लाभणार आहे.

देशभरात असे लघु अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात एफटीआयआय विविध राज्य सरकारे, विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थाशी चर्चा करत आहे.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी एफटीआयआयने चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात कौशल्यपूर्ण भारत बनवण्यासाठी कॅनॉनला आपला तंत्रज्ञान भागीदार तर यासुका अ‍ॅण्ड कॅटबनला प्रकाश योजना भागीदार बनवले आहे.

LEAVE A REPLY

*