एप्रिलमध्ये 26 लाखाची अवैध दारु जप्त

0

नंदुरबार /महामार्गावरील दारुबंदी झाल्यानंतर गेल्या महिन्यात जिल्हा पोलीस दलाने 16 लाख 33 हजार 243 रुपयांची गावठी, देशी, विदेशी दारु व इतर साधने जप्त करण्यात आली.

 गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी उपयोगात येणारा 10 लाख 27 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

असा एकुण 26 लाख 60 हजार 703 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 271 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारुविक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दारुविक्रीवर निर्बंध बसावा यासाठी जिल्हयातील अवैध दारु निर्मिती व विक्री करणार्‍या इसमांवर धडक कारवाईची मोहिम दि. 1 ते 30 एप्रिलदरम्यान राबविण्यात आली.

या कालावधीत अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे, विना परवाना देशीविदेशी दारु वाहतूक करणारे, विक्री करणार्‍या 271 इसमांवर 270 केसेस करण्यात आल्या.

या मोहिमेत अवैध गावठी हातभट्टीची दारु, देशी विदेशी दारु व इतर साधने असा एकुण 16 लाख 33 हजार 243 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गावठी हातभट्टीची दारु करण्यासाठी उपयोगात येणारा एकुण 10 लाख 27 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

अस एकुण 26 लाख 60 हजार 703 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*