एटीएम बंद असल्यामुळे तीन हजार एटीमकार्डधारक त्रस्त

0

पुणतांबा (वार्ताहर)- परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदारांच्या सोयीसाठी दोन वर्षापूर्वी सुरु केलेले पुणतांबा येथील एटीएम केंद्र सातत्याने बंद राहत असल्यामूळे येथील बँक खातेदार त्रस्त झाले असून हे एटीम केंद्र असून अडचण वनसून खोळंबा असल्यासारखे आहे.

 

 

पुणतांबा येथे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा आहे. बँकेत बावीस हजार खातेदार असून त्यापैकी सहा हजार खात्यावरचा व्यवहार कार्यरत नाही. खातेदाराची संख्या विचारात घेऊन तसेच खातेदारांच्या मागणीमुळे येथे एटीएम सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

 

 

3 हजार 712 खातेदारांना एटीएमचे कार्ड देण्यात आले आहे. प्रत्यक्षात एटीएम केंद्र कधी बंद कधी चालू राहते तसेच अनेक वेळा तांत्रिक बिघाड येतो. त्यामूळे ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. याबाबद येथील बँक व्यवस्थापकांना गौतम थोरात, बाळासाहेब चव्हाण, प्रा डॉ. बखळे यांनी प्रत्यक्ष भेटून बंद असण्याचे कारण विचारले असता ही सेवा आऊटसोर्सिंग केलेली आहे.

 

 

खातेदारांच्या आम्ही वरीष्ठांना कळविलेल्या आहेत. आमच्या हातात काही नाही असे स्पष्टीकरण दिले या शाखेत स्टाफ ही अपुरा आहे त्यामूळे खातेदारांची रोज गर्दी असते. एटीएम केंद्र तातडीने सुरु झाले नाही तर खातेदारांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*