एचडीएफसीचा UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय मागे

0

एचडीएफसी बँकने 10 जुलैपासून यूपीआय व्यवहारांवर चार्ज लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

एचडीएफसीने ई-मेलद्वारे 10 जुलैपासून यूपीआयच्या व्यवहारांवर चार्ज लावणार असल्याची माहिती ग्राहकांना दिली होती.

10 जुलैपासून खातेधारकांना 1 रुपया पासून 25 हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय ट्रांझॅक्शनवर 3 रुपये चार्ज अधिक सर्विस टॅक्स द्यावा लागणार होता.

तसेच 25 हजार आणि 1 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये चार्ज द्यावा लागणार होता.

LEAVE A REPLY

*