एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार

0

तैवानमधील एचटीसी स्मार्टफोन कंपनी ही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ढेपाळल्याचेही दिसून येत आहे.

विशेष करून सॅमसंग, अ‍ॅपल, एलजी, सोनी आदींसारख्या प्रस्थापित ब्रँडसोबत चिनी कंपन्यांनी अतिशय उत्तमोत्तम स्मार्टफोन सादर करून एचटीसीला आव्हान दिले.

गेल्या वर्षभरात तर एचटीसीच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एचटीसी यु ११ या मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळूनही झालेली ही घसरगुंडी कंंपनीच्या चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे.

या पार्श्‍वभूमीवर एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हे डील आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

*