Type to search

क्रीडा

एक खेळाडू डिप्रेशनमध्ये, पाकविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे तीनच ङ्गलंदाज खेळणार

Share

लंडन | ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने पाकिस्तानिविरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेत ङ्गक्त तीनच खेळाडू खेळणार असल्याचे सांगितलं आहे. वॉर्नरसह तीन ङ्गलंदाज खेळणं निश्चित असून एक खेळाडू सध्या डिप्रेशनचा सामना करत आहे. वॉर्नर, स्मिथ, लॅब्युशेन हे खेळणं नक्की आहे. तर युवा खेळाडू विल पुकोवस्की डिप्रेशनमध्ये आहे. त्याला २१ नोव्हेंबरपासून होणार्‍या पहिल्या कसोटीमध्ये संधी द्यायला आवडेल असं पॉंटिंगने सांगितलं.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला ऍशेस मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. इतकंच काय त्याला दुहेरी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. पॉंटिंग म्हणाला की, वॉर्नर ओव्हलवर शेवटच्या कसोटीत दुसर्‍या डावात शून्यावर बाद झाला. तरीही तो संघात कायम राहणार आहे. तर मार्नस लॅब्यूशेन आणि स्मिथ यांचं स्थान पक्कं आहे.

पॉंटिंगने सांगितलं की, मधल्या ङ्गळीत मॅथ्यू वेड आणि ट्रेव्हिस हेड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध आघाडीच्या आणि मधल्या ङ्गळीतील ङ्गलंदाजीत बदल केला. यामध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून बॅनक्राफ्ट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यांना संघातून बाहेर बसवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदी टिम पेनला ठेवायला हवं. किमान पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध तरी त्याच्याकडेच नेतृत्व असायला पाहिजे असं पॉंटिंग म्हणाला. चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने ऍशेसमधून पुनरागमन केलं आहे. स्टीव्ह स्मिथ ङ्गॉर्ममध्ये आहे तर वॉर्नर धावांसाठी झगडताना दिसत आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियाला एकहाती ऍशेस मालिका जिंकून दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!