एकाच पावसात एकरुखेचे चारही तळे भरले

0

एकरूखे (वार्ताहर)- गणेशनगर परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने एकरूखे येथील चार बंधारे 4 तासात संपूर्ण भरले. तर रांजणगाव येथील एक साठवण तलाव फुटला.

 

गुरुवारी संध्याकाळी दीड तास झालेल्या जोरदार पावसाने एकरूखे येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून त्याखाली असलेले दोन तळे ही भरले. तर चौथे आग्रे वस्ती येथील साकळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. तर दूसरीकडे रांजणगाव हद्दीत असलेले मुजमुले तळे हे फुटल्यामुळे आग्रे वस्ती जवळचा साकळी बंधारा भरुन वाहत आहे.

 

एकरूखे येथील साठवण तलाव गेल्या 15 वर्षापासून भरला नव्हता. मात्र गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने 72 एकराचे असलेले साठवण तलाव चार तासात भरून वाहू लागले आहे तर दुसरीकडे शेतीमध्ये ही पाणी साचले आहे.

LEAVE A REPLY

*