एकवीरा चौकात भरदिवसा डॉक्टरचे घर फोडले

0

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील सावेडी परिसरात एकविरा चौक येथे डॉ. तृप्ती भरत कोटूळे यांच्या घरी अज्ञात चोरांनी घरफोडी केली. ही घटना मंगळवारी (दि.3) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान भर दिवसा घडली. याप्रकरणी कोटूळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृप्ती कोटूळे या नेहमीप्रमाणे सकाळी काम अटपून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. जाताना काळजीपुर्वक घराला लॅक लावले होते. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हॉस्पिटलचे काम करून त्या घरी आल्या. त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुडलेला दिसला. घरात चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी चाचपणी केली. घरातील काही साहीत्य अस्तव्यस्त पडले होते. कोटूळे यांनी कपाटाचा दरवाजा उघडला असता त्यांना लक्षात आले की त्यातील सोन्याचे दागीने व काही रोख रक्कम असा 70 हजार रुपांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. कोटूळे यांनी हा प्रकार घरातील अन्य व्यक्तींना सांगितला असता त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्या जवळच काही दिवसापुर्वी अशा प्रकारे भर दिवसा घरफोडी झाल्याचे त्यांना माहीत होते. मात्र त्यातील आरोपी अद्याप मोकाट असून गुन्ह्याची उकल झालेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करावा की नाही असा विचार नातेवाईकांनी केला. या प्रकारानंतर डॉक्टर कोटूळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही कागदपत्रे जवळ नसल्यामुळे ते गावी गेले व सोन्याच्या दागीन्याच्या पावत्या व अन्य कागदपत्रे जमा करून त्यांनी शुक्रवारी (दि.5) रोजी दुपारी 3 वाजता फिर्याद दिली.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी काही संशयीत आरोपींची चौकशी केली. अशा प्रकारे घरफोड्या करणारे आरोपी बाहेरील देशातील असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. मात्र त्यांना स्थानिक आरोपींची साथ असल्याचे देखील पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या आरोपींच्या शोधात पोलीस विशेष पथक पाठविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ए. के. पवार करीत आहेत.

तोफखान्यातील गुन्हे कायम तपासावर
भर दिवसा तोफखान्याच्या हाद्दीत चोर्‍या घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुर्वी एका प्राचार्यांची घरफोडी झाली होती. त्यात आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. तसेच पुण्यातील एका अप्पर पोलीस अधिक्षकांचे नातेवाईक सावेडीत राहतात त्यांच्या घरी सायंकाळी घरफोडी झाली होती. त्यांनी पोलीस अधिक्षकांवर दबाव आणून देखील ही घरफोडी उघड झाली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडे घडलेल्या घटनांची तक्रार करावी की नाही असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आरोपींना लवकर अटक करू
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही संशयीतांची चौकशी केली आहे. पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आरोपींच्या शोधात आहेत. घरफोड्या उघड करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी देखील थोडी काळजी घ्यावी. आरोपींच्या मागासाठी त्या रस्त्यावरी काही सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींना लवकरात लावकर अटक करण्याचे प्रयत्न केले जाईल.
– नारायण वाखारे, तोफखाना पोलीस निरीक्षक

 

LEAVE A REPLY

*