एकच प्याला महागात!

0

हॉटेल उमराववर छापा  28 जण पकडले

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाईपलाईन रोडवरील हॉटेल उमराववर गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून 28 मद्यपींना अटक केली. पाईपलाईन रोडवरील या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

 
राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांना हॉटेल उमरावमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी फौजफाट्यासह रात्री 11.30 च्या सुमारास हॉटेल उमराव येथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये 28 जण मद्य पित बसले होते. या सर्वांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच हॉटेलचालक विशाल पवार याला ताब्यात घेण्यात आले.

 

हॉटेलच्या जागामालकासही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाला याठिकाणी 13500 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. हा माल जप्त करण्यात आला असून आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याठिकाणी सापडलेला दारूसाठा हा वाईन शॉपमधून खरेदी केलेला आहे. संबंधित वाईन शॉपवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. यापूर्वी 15 तारखेला पाईपलाईन रोडवरील काही टपर्‍या व हॉटेल याठिकाणी छापे टाकून 10 तळीरामांना अटक करण्यात आली होती.

 

त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्रीची कारवाई अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. ए. जवळीकर, दुय्यम निरक्षक दहिवडे, दुय्यम निरक्षक बी.एस.गलांडे, योगेश मडके, दिलीप पवार, रुपेश चव्हाण, अविनाश कांबळे, गदादे यांनी केली.

 

हे आहेत आरोपी : श्रीकांत बारस्कर, निलेश अंदुरे, सांरग साठे, सागर संगम, राहीत जेठला, अरुण पिक्सा, गणेश पळसीकर, सोपान बेरड, सचिन जरे, राजेंद्र बेरड, मंदार कुलकर्णी, गोकुळ हांडे, रवींद्र वाघ, संदीप तागड, शेखर तुंगार, बाळासाहेब ढाणे, श्रीकांत वारे, सुशिल ओस्वाल, सुधीर धामणे, शंकर मकासरे, विकास खरात, विक्रम पाचारे, रवि संधान, संतोष तुपे, अमित दळवी, योगेश रामकर, विजय वाघ, विशाल पवार.

LEAVE A REPLY

*