Type to search

ब्लॉग

‘ऊर्जादायी’ गौरव

Share

थियम आयन बॅटरीचा विकास करणार्‍या आणि जीवाश्म इंधनाचे वर्चस्व संपवून पर्यावरणाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकणार्‍या तीन रसायनशास्त्रज्ञांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासशी निगडीत असलेले अमेरिकन वैज्ञानिक जॉन गुडेनफ, बिंघमटनमधल्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधील के. एम. स्टेनली व्हिटिंघम तसेच जपानमधील के असाही कासेई कॉर्पोरेशन अ‍ॅण्ड मिजो विद्यापीठाचे अकिरा योशिनो यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.

1970 च्या दशकात व्हिटिंघम यांनी पहिली लिथियम बॅटरी बनवली. गुडेनफ यांनी पुढच्या दशकात या बॅटरीची क्षमता वाढवून दुप्पट केली. तर योशिनो यांनी बॅटरीमधील शुद्ध लिथियम बाहेर काढून टाकून या बॅटरीमुळे निर्माण झालेली असुरक्षितता घालवून तिची सुरक्षितता वाढवली. लिथियम आयन बॅटरीला आधुनिक बॅटरी म्हटले जाते. लिथियम बॅटरी शोधण्याचा पहिला प्रयत्न केला तो एम. एस. व्हिटिंघम यांनी. 1970 मध्ये त्यांनी वीजनिर्मितीसाठी टायटेनियम सल्फाईड आणि लिथियम धातूचा वापर केला होता. हा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता. 1980 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील जॉन गुडेनफ आणि कोईची मिजुशिमा यांनी रिचार्जेबल लिथियम बॅटरी दाखवली. जॉन गुडेनफ यांना लिथियम बॅटरीचे जनक किंवा फादर असे म्हटले जाते. 1997 मध्ये सोनी आणि असाही कसाई यांच्याकडून पहिली लिथियम पॉलिमर बॅटरी सादर झाली. मोबाईलमध्ये लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमर बॅटरीचा वापर केला गेला.

लिथियम आयन बॅटरी रिचार्जेबल बॅटरीच्या साखळीतील एक दुवा आहे. त्यात प्रामुख्याने तीन घटकांचा वापर संयुक्तपणे केला जातो. निगेटिव्ह व पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाईट. बॅटरीमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोडसाठी कार्बनचा वापर केला जातो. लिथियम बॅटरीची सर्वात मोठी खासियत ही आहे की व्होल्टेज गरजेनुसार या घटकांचे एकत्रिकरण कमी किंवा जास्त करू शकतो. हे सर्व एखाद्या लहानशा पाकिटातही तयार करता येते. या संयुगाचा आकार इतका लहान असू शकत असल्यानेच मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये त्याचा बेधडक वापर केला जात आहे. बोली भाषेत त्याला लिऑन बॅटरी असे म्हटले जाते.

मोबाईलमध्ये बॅटरीच नसेल तर तो बिनकामाचा ठरतो. मात्र त्याच मोबाईलमध्ये बॅटरीचा योग्य वापर झाला नाही तर आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. म्हणजे मोबाईल रिचार्ज करतेवेळी फोन करू नये किंवा फोनवर बोलू नये. चार्जिंग करताना बॅटरी खूप जास्त गरम होत असेल तर चार्जिंग बंद करून मोबाईलसह सर्व्हिस सेंटर गाठावे. लिथियम आयन बॅटरी असेल आणि मोबाईल पूर्ण चार्ज झालेला दाखवत असेल तर चार्जिंग काढून टाकावे.

मोबाईल विनाजग आणि लिथियम बॅटरीशिवाय मोबाईल दोन्ही आता सुनेच वाटेल. त्यामुळे लिथियम बॅटरीचा विकास करणारे हे शास्त्रज्ञ खर्‍या अर्थाने आपल्याला वरदान देणारे आहेत. संसदेतील लिथियम बॅटरीच्या तीन संशोधकांना यंदाच्यावर्षातला रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाआहे. त्यामुळे लोकांचे आयुष्य सुकर झाले आहे.
प्रा.विजया पंडित

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!