उस्थळ दुमाला येथे घरफोडी पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

0

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे वरच्या जिन्याच्या दारातून आत प्रवेश करूैन घरातील 6 तोळे सोन्यासह 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना काल शुक्रवारी घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 
याबाबत संभाजी सुर्यभान भदगले (रा. उस्थळ दुमाला ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 9 जून रात्री 1 ते पहाटे साडेपाच या दरम्यान उस्थळ दुमाला येथे राहत्या घरात चोरट्यांनी वरच्या जिन्याच्या दरवाजातून घरात प्रवेश करुन सुटकेस व बॅगामधून दीड लाख रुपये किंमतीचे 6 तोळे सोने तसेच 8 हजार रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

 

 
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे करत आहेत.

 

नेवासा पोलीस ठाण्याचा
दूरध्वनी 6 दिवसांपासून बंद!

नेवासा येथे चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. चार दिवसांपूर्वी देवगड फाटा येथे बियाणे दुकानात सव्वादोन लाखांची चोरी झाली होती. अपघात, मारामारीच्या घटनाही घडत असतात. मात्र येथील पोलीस ठाण्याचा दूरध्वनी आठवडाभरापासून बंद आहे. तो नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते.

 

 

अधिकार्‍यांचे भ्रमणध्वनी क्रमांक माहित नसल्याने एखादी घटना घडल्यास नागरिक पोलिसांना दूरध्वनी करून कळवतात. पोलिसांची मदत मिळाली तर चोरटे ताबडतोब सापडूही शकतात. मात्र येथील दूरध्वनी बंदच असतो.

 

 

नेवाशातून शंभर नंबर डायल केल्यास शेवगाव पोलीस ठाण्याचा नंबर लागतो. सामान्य नागरिकांचे नादुरुस्त दूरध्वनी तासाभरात दुरुस्त करून मिळत असताना पोलीस ठाण्याचा दूरध्वनी कसा दुरुस्त होऊ शकत नाही हा सामान्य जनतेला प्रश्‍न पडला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*