Type to search

नंदुरबार

उमवितर्फे ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन; कुलगुरु प्रा.डॉ.पाटील

Share

नंदुरबार । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या शैक्षणीक वर्षात ऑगस्ट महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जळगाव येथील एम.जे. महाविद्यालयात विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नंदुरबार येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमीच्या माध्यमातून सिलेज बेस्ट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणे ही खुप मोठी गोष्ट आहे. या शैक्षणीक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापिठातर्फे विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनात विविध साहित्यीक विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहित्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मान्यवरांच्या मागदर्शनामुळे विद्यार्थ्यांना साहित्यातील बारकावे कळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळणार आहे. राज्यातच नाही तर देशात पहिल्यांदाच असे विद्यार्थ्यांसाठी साहित्य घेण्यात येत आहे. जळगांव येथील एम.जे.कॉलेज येथे ऑगस्ट महिन्यात विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. यासह विविध खेळांसाठी विद्यार्थी स्पर्धेनिमित्त जात असतात.त्यामुळे खेळाडू विद्यार्थी परिक्षेपासून वंचीत राहतात.

त्यामुळे त्यांच्यासाठी विद्यापिठाने फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री.पाटील म्हणाले. नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित हिरालाल चौधरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख प्रा.एस.टी बेंद्रे, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार शास्त्रज्ञ डॉ.अजित पाटणकर,विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील,आदिवासी अकादमीचे संचालक प्रा.ए.बी चौधरी, उद्योगपती प्रा.डॉ.रवींद्र चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, सिनेट सदस्य प्रा.डॉ. दिनेश खरात, हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका प्रणिता चौधरी, हिरा प्रतिष्ठानचे सचिव रुपेश चौधरी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!